المدة الزمنية 7:43

ट्रैक्टर द्वारे शेतीची नांगरणी कशी करावी यांत्रिक शेती

38 138 مشاهدة
0
662
تم نشره في 2019/05/07

ट्रैक्टर द्वारे शेतीची नांगरणी कशी करावी पारंपरिक शेतीला फाटा देऊन प्रत्येक शेतकरी आधुनिकतेची कास धरू लागला आहे. शेती व्यवसायात यांत्रिक शेतीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. त्यातून प्रत्येक शेतकरी नवनवीन प्रयोग करीत आहे. या संक्रमणावस्थेत यांत्रिक शेतीचा मानबिंदू ठरला तो ट्रॅक्टर. शेतक-यांच्या अंगणात दिसणा-या खिल्लारी बैलजोडीची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. नांगरणी, वखरणी, पेरणी आदी कामे पारंपरिक पध्दतीने करण्यात जाणारा वेळ व त्यासाठी लागणारे कष्ट शेतक-यांना परवडणारे नाहीत. बदलत्या काळात कमी कमी वेळेत जास्तीतजास्त काम करण्याचे सूत्र ट्रॅक्टरच्या माध्यमातून साकार झाले. त्यामुळे ट्रॅक्टर शेतक-यांचा खरा मित्र संबोधला जात असून, त्याद्वारे शेतीची मशागत करण्याकडे शेतक-यांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. लहानशा खेड्यातही छोट्या शेतक-याच्या दारापुढे ट्रॅक्टर दिसण्याचे कारणही यांत्रिक शेतीला दिले जाणारे प्राधान्य हेच आहे. उन्हाने तप्त झालेली कडक जमीन नांगरता नांगरता महिनाभराचा कालावधी शेतक-यांना लागत होता. जमिनीचा पोत कडक असेल तर चार बैलांनी नांगरणी केल्याशिवाय शेतक-याला गत्यंतर नव्हते. खाचखळग्यांची शेती सपाट करण्याचे कामही तेवढेच वेळखाऊ होते. शेतक-यांना यासाठी मोठे कष्ट उपसावे लागत होते. हे चित्र इतिहास बनले आहे. ट्रॅक्टरने शेती व्यवसायात मोठा बदल घडवून आणला आहे. घराघरासमोर ट्रॅक्टर.*DOWNLOAD APP --- https://play.google.com/store/apps/details?id=com.agrowone.agrowonemarathi&hl=en_IN WHATSAPP https://wa.me/919172800247 VISIT OUR WEBSITE https://agrowone.in/ 📞📞 https://wa.me/919172800247 शेतक-यांच्या घराघरासमोर ट्रॅक्टर उभा दिसल्यास सधन व आधुनिकतेची कास धरलेला शेतकरी अशी बिरुदावली सहज मनात येऊन जाते. खेड्यापाड्यात, डोंगर कपा-यात ट्रॅक्टरचा घुमलेला आवाज शेतक-यांच्या मनावर राज्य करू लागला आहे. हजार लोकसंख्येच्या लहानशा खेड्यातही शंभरावर ट्रॅक्टर आढळून येतात. बहुउपयोगी यंत्र - साधा नांगर, पलटी नांगर, पळी नांगर अशी यंत्रे जोडून शेतक-यांना हवी त्या प्रकारात नांगरणी करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. रोटर, फण, फळी, पेरणी ही यंत्रे जोडून ट्रॅक्टरद्वारे बहुपर्यायी कामे करून घेतली जातात. जमीन सपाटीकरणासाठी फळी, तात्पुरत्या मशागतीसाठी फण व पेरणीसाठी पेरणी यंत्र जोडून कामे केली जातात. शेतीसाठी बहुपयोगी - मेसी फर्ग्युसन 241 : 12 वर्षांपासून वापरत आहे. वैशिष्ट्ये :- पॉवरफुल पॉवर स्टेअरिंग, मशीन, पॉवरफुल, लोडला कोणतीच अडचण नाही. पिकअप चांगला तसेच ‘लक्ष्मी ट्रॅक्टर्स’ यांची सर्व्हिस चांगली आहे. तसेच सर्व त्यांच्याकडून मिळते. घरी येऊन सर्व्हिसिंग देतात. शेतीचा पहिला टप्पा नांगरणीचा नांगरणी वरच पिकांचे जामिनीचे कस अवलंबुन असतो. जस आपण मुरमरे पुर्णपणे तेल मिठ मिरच्यात घोळत नाही तो पर्यंत टेस्ट मिळत नाही. त्या प्रकारे जमिन खोलवर नांगरणी करून वकरणी करून भुसभुशीत करत नाही तोपर्यंत जमिनीला पिकाला कस येणार नाही उत्पादनात वाढ होणार नाही . जमिनीची मशागत खुप महत्त्वाची आहे .नांगर पुढे चालण्याच्या दिशेला विशिष्ट कोनात तवे बसविलेले असतात. नांगर चालताना हे तवे फिरत असतात त्यामुळे हा तव्याचा नांगर विशेषतः कडक जमिनीची नांगरणी करण्यास उपयुक्त पडतो. ट्रॅक्टरचलित तव्यांचा कुळव या कुळव्यात विशिष्ट कोनाकार ओळीवर तवे बसविलेले असतात. हे तवे कुळव चालण्याचा दिशेला कोनाकार फिरतात. तव्याचा कोन वाढवून जमिनीत अधिक खोलीपर्यंत काम करता येते नांगरणीनंतर जमिनीत राहणारी ढेकळे फोडण्यासाठी या तव्यांचा कुळवाचा उपयोग होतो. कल्टिव्हेटर: पेरणीपूर्व मशागतीसाठी शेताची नांगरणी केल्यानंतर कुळवाप्रमाणेच कल्टिव्हेटरचा वापर करणे पेरणीसाठी जमीन तयार करण्याच्या कामी उपयुक्त ठरते. कल्टिव्हेटर बैलचलित तसेच यंत्रचलित प्रकारचे वापरात आहेत. कल्टिव्हेटरच्या वापरामुळे जमिनीतील ढेकळे फोडणे, तणांचे निर्मूलन करणे आणि जमीन भुसभुशीत करुन ती पेरणीयोग्य केली जाते. बैलचलित कल्टिव्हेटरचा वापर पिकांच्या आंतरमशागतीसाठी सुद्घा करता येतो. तण निर्मूलनाबरोबरच पिकाला भर लावण्याचे कामही यामुळे होते. बैलचलित कल्टिव्हेटरमध्ये ५ ते ७ फणांचा किंवा २-३ इंग्रजी ‘ व्ही ’आकाराच्या पात्यांचा वापर केला जातो. ट्रॅक्टरचलित कल्टीवेटर साधारणतः ७,९,१३,१५ इ.टाइन्स असतात. ट्रॅक्टरचलित पलटी नांगर ट्रॅक्टरचलित पलटी नांगरामुळे जमीन कापली जाते, तसेच उचलून पलटली जाते. परिणामी जमिनीची पोत राखला जातो. पेरण्यात येणाऱ्या बियांसाठी योग्य ती वातावरण निर्मिती तयार होते. ट्रॅक्टरचलित रोटाव्हेटर या यंत्रात क्षितिजसमांतर शाफ्ट असून, त्यावर विविध प्रकारची पाते बसवलेली असतात. त्यामुळे जमिनीची चांगली मशागत होते. तसेच या यंत्राद्वारे जमीन पेरणीयोग्य तयार होते. #ॲग्रोवन , ऑनलाइन भेट द्या ------------------------------------------------------- 📱मोबाईल ॲप्लिकेशन https://play.google.com/store/apps/details?id=agrowone.com 🌐 वेबसाइट - https://www.agrowone.com 👍 फेसबुक - https://www.facebook.com/agrowone 📸 इंस्टाग्राम - https://www.instagram.com/agrowone  ट्विटर - https://twitter.com/agrowone टेलेग्राम - https://t.me/Agrowone ------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone

الفئة

عرض المزيد

تعليقات - 43